जळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील सुभाष चौकातील शुभ लाभ ज्वेलर्समधून अज्ञात महिलेने सोन्याच्या बारा अंगठ्या चाेरुन नेल्या. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भवानी मंदिराजवळील सुभाष चौक सराफ बाजार परिसरातील योगेश पंढरीनाथ सुवर्णकार यांच्या शुभ लाभ ज्वेलर्स दुकान आहे. रविवार (दि.२१) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुकानात असताना एक अनोळखी महिला सोन्याची अंगठी घेत असल्याचा बनाव करून दुकानात आली. त्यानंतर तिने १ लाख ७७ हजार चारशे रुपयांच्या बारा अंगठ्या हातचलाकी करत चोरल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे हे करीत आहेत.
हेही वाचा: