Latest

IPL 2023 Mini Auction : छोट्या देशांचे खेळाडू घडवणार मोठा इतिहास

Arun Patil

इंडियन प्रीमियर लीग 2023 साठीचे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) शुक्रवारी कोची येथे होणार आहे. त्यासाठी सर्व दहा फ्रँचाईझींचे प्रतिनिधी केरळ येथे दाखल झाले आहेत. या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रँचाईझींनी अतिरिक्त 36 खेळाडूंची नावे सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या 405 अशी झाली आहे. यामध्ये 273 भारतीय व 132 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 119 खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि 282 खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी 87 खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. या लिलावात छोट्या देशाचे काही खेळाडू अनपेक्षित लक्षवेधी रक्कम मिळवून मोठी कामगिरी करू शकतात.

सिकंदर रझा (झिम्बाब्वे) (IPL 2023 Mini Auction)

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वे ने मोठा अपसेट घडवला होता आणि त्यांनी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. सिकंदर रझाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. सिकंदरने या स्पर्धेत 7 सामन्यांत 147 च्या स्ट्राईक रेटने आणि 31 च्या सरासरीने 219 धावा केल्या. रझा सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्याने 10 विकेटस्ही घेतल्या. रझा आयपीएलमध्ये 50 लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

लार्कन टकर (आयर्लंड)

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आयर्लंडचा फलंदाज लार्कन टकरने धावांचा पाऊस पाडला. या संघाने वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना पराभूत केले. टकरने सात सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरी आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या. या संघाने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. टॉप ऑर्डर बॅटस्मन टकर आयपीएलमध्ये 50 लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

जोश लिटल (आयर्लंड)

आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. त्याने केन विल्यम्सन, जिमी नीशाम आणि मिचेल सँटनर यांना बॅक टू बॅक माघारी पाठवले होते. जोश हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो 50 लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे. लिटनने वर्ल्डकप स्पर्धेत सात सामन्यांत 11 विकेटस् घेतल्या.

कार्तिक मयप्पन (यूएई)

मूळचा चेन्नईचा असलेला कार्तिक मयप्पन यूएईकडून खेळतो. या लेगस्पिनरने श्रीलंकेसारख्या मोठ्या संघाला वर्ल्डकप स्पर्धेत अडचणीत आणले. मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. कार्तिक फक्त 20 लाखांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहे.

हेही वाचा…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT