Latest

Baramati Accident News : अपघातात जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू 

अमृता चौगुले
बारामती : पुढारी वृत्तसेवा:  बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे, ता. इंदापूर) यांचे सोमवारी (दि. २५) उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ते व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.
उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा बारामतीला हलविण्यात आले होते. येथे उपचारा दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.  पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते.
हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT