Latest

India’s first polar research ship : भारताचे पहिले ध्रुविय संशोधन जहाज लवकरच तयार होणार! मंत्री रिजिजू यांनी मांडली योजना

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : India's first polar research ship : येत्या पाच वर्षांत भारताने पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच वर्षांत भारत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज (PRV) तयार करण्याची योजना आहे. अंटार्क्टिकामधील भारताचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आहे. जहाजाबाबतच्या प्रस्तावाला चालू आर्थिक वर्षात कॅबिनेटची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. (India's first polar research ship)

रिजिजू यांनी जाहीर केले की आणखी एक प्रयत्न सुरू करण्यात आला आहे आणि एक प्रस्ताव आता EFC (Expenditure Finance Committee) द्वारे तयार आहे. या जहाजाची अंदाजे किंमत 2,600 कोटी रुपये करण्यात आली आहे, असे रिजिजू यांनी नमूद केले आहे.

या आर्थिक वर्षात जहाजासाठीच्या खर्चाचा अंदाज मंत्रिमंडळात प्रस्तावित केला जाईल. येत्या पाच वर्षांत जहाज तयार केले जाईल याची पूर्ण तयारी सुरु असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले. 2014 मध्ये कॅबिनेटने जहाजाच्या अधिग्रहणासाठी 1,051 कोटी रुपये आधीच मंजूर केले होते. यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती. मात्र जहाज बांधण्यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीने दिलेल्या काही अटींमुळे हा प्रकल्प बारगळला.

या जहाजामुळे हवामान बदलांचा अभ्यास करणे सोपे

भारतीय महासागराला लागून असलेल्या ध्रुवावरील अभ्यास या जहाजाद्वारे केला जाणार आहे. मान्सूनवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. याच मान्सूनचा लहरीपणा, सध्या होत असलेले त्यातील बदल, आगामी काळात होऊ घातलेले बदल, जागतिक तपमान वाढ किंवा हवामान बदलाचा मान्सूनवर होणारा परिणाम या साऱ्याचा शोध घेणे गरजेचे आहे. याच अभ्यासासाठी भारताने या दोन्ही ध्रुवांकडे लक्ष केंद्रित केले आहे. गोव्यातील अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्र त्यासाठी काम करीत आहे. यामध्ये आता भारताचे हे चोहोबाजूंनी बर्फांनी व्यापलेले हे पहिलं जहाज लवकरच येईल असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT