Latest

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालाचा झटका; टाटांकडून निर्णयाचे स्वागत

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी टाटासन्सच्या (Tata Sons) अध्यक्षपदासंदर्भात एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सायरस मिस्त्री यांना झटका दिला आहे. या संदर्भात जेष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) व टाटा सन्सने या निकालाचे स्वागत केले आहे. सायरस मिस्त्री यांच्याबाजूने शापूरजी पालोनजी (Sapoorji Pallonji) समुहाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची २०१२ साली टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ साली त्यांनी या पदावरुन हटविण्यात आले होते. या संदर्भात सायरस मिस्त्री यांनी या निर्णयास आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०२१ मध्ये याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. या निकालाचा पुनर्विचार केला जावा अशी याचिका सायरस मिस्त्री यांच्यातर्फे शापूरजी पालोनजी समुहाने दाखल केली होती. मात्र पुन्हा न्यायालयाने आपला पुर्वीचाच निकालास योग्य ठरवले.

यावेळी निकाल देताना मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २०२१ साली जो निकाल दिला होता त्यामध्ये सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या बाबत काही नकारात्मक टिप्पणी केली होती. या टिप्पणीस हटविण्याची परवानगी या नव्या निकालात न्यायालयाने दिली आहे.

उद्योगपती रतन टाटा आणि टाटा सन्स यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शापूरजी पालोनजी (Sapoorji Pallonji) समूहाची याचिका फेटाळल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. एसपी ग्रुपने आपल्या याचिकेत सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या (Tata Sons) कार्यकारी अध्यक्षपदावरून हटवण्याचा टाटा समूहाचा निर्णय कायम ठेवण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना रतन टाटा म्हणाले, "आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि कायम ठेवलेल्या निकालाचे आम्ही आमच्या बाजूने कौतुक करू इच्छितो".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT