Latest

इंटरनेट कसे काम करते?

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : इंटरनेटमुळे सध्या खर्‍या अर्थाने जग म्हणजे एक छोटे खेडे बनले आहे. संपूर्ण जगाला एकत्र आणणारे हे माहितीचे जाळे आपल्या दैनंदिन जीवनाचाही अविभाज्य भाग बनलेले आहे. इंटरनेटशिवाय तासभरही आपण राहू शकत नाही. रेशन खरेदी करण्यापासून ते बँकिंगपर्यंत सर्व कामांसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत; पण इंटरनेट कसं काम करतं तुम्हाला माहितीये का? जर तुम्हाला इंटरनेटचा साधा अर्थ समजला तर 2 किंवा अधिक कॉम्प्युटर्सच्या कनेक्शनला 'इंटरनेट' म्हणतात. अमेरिकन गुप्तचर विभागाने दोन कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून याची सुरुवात केली होती. इंटरनेटचा वापर सर्वप्रथम गुप्तचर माहिती एका कॉम्प्युटरवरून दुसर्‍या कॉम्प्युटरवर सुरक्षितपणे पाठवण्यासाठी करण्यात आला. आजही इंटरनेटमुळे एक कॉम्प्युटर दुसर्‍या कॉम्प्युटरला जोडला जातो; पण आता आणखी एक गोष्ट आली आहे ज्याला 'सर्व्हर' म्हणतात. हे सर्व्हर एकत्र करून डेटा सेंटर्स किंवा डेटा रूम तयार होतात. तुम्ही 'गुगल' किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनकडून कोणतीही माहिती विचाराल, ती माहिती त्याच्या डेटा रूममध्ये असलेल्या सर्व्हरमधून तुमच्यापर्यंत येईल. डेटा सेंटरमध्ये अनेक सर्व्हर आहेत ज्यामध्ये इंटरनेटवरील सर्व माहिती स्टोअर केली जाते. जगभरातील कॉम्प्युटर या डेटा सेंटर्सशी जोडलेले आहेत. अनेक कंपन्या डेटा सेंटरची सुविधा देतात. डेटा सेंटर सेवा कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचाही सहभाग आहे.

जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर कंपनी अमेरिकेची 'केडीडीआय' आहे. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. या लिस्टमध्ये अ‍ॅमेझॉन तिसर्‍या नंबरवर आहे. 'गुगल'चे स्वतःचे डेटा सेंटर आहेत. तुम्ही इंटरनेटवर कोणतीही माहिती विचारता तेव्हा ही रिक्वेस्ट त्या डेटा सेंटर्सकडे जाते ज्यांच्या सर्व्हरवर सर्व माहिती उपलब्ध असते. यानंतर तिथे लावलेला एक विशेष कॉम्प्युटर ज्याला 'राउटर' म्हणतात. ते ठरवते की, कशी ही सूचना आपल्या इंटरनेट प्रोव्हायडरपर्यंत पोहोचवावी. यानंतर, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्कच्या श्रृंखलेच्या माध्यमातून ही माहिती आपल्या इंटरनेट प्रोव्हायडर आणि नंतर आपल्या कॉम्प्युटरपर्यंत येते. आता समुद्रात टाकण्यात येणार्‍या ऑप्टिकल फायबर केबल जाणून घेऊया. डेटा सेंटर्समध्ये उपस्थित असलेले सर्व्हर या ऑप्टिकल फायबर्सद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. या केसांपेक्षा बारीक तारा असतात आणि एका केबलमध्ये अनेक तारा असतात. ऑप्टिकल फायबर डेटा घेऊन खूप वेगाने प्रवास करतो. जगभरातील समुद्रांमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरलेले आहे, जे या डेटा सेंटर्सला जोडतात. इंटरनेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3 कंपन्यांची मदत घेते. पहिली कंपनी तुमची इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. दुसरी कंपनी जी समुद्रात ऑप्टिकल फायबर घालते ज्याद्वारे माहिती तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत पोहोचते. (टाटा कम्युनिकेशन हे काम भारतात करते.) तिसरी कंपनी डेटा सेंटर सेवा कंपनी आहे जिथून या ऑप्टिकल फायबर्सद्वारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT