Latest

पाय मोडला अन् ती झाली करोडपती!

Arun Patil

लंडन : अपघातात पाय गमवावा लागल्यानंतर तासाभरातच ओस्लो येथील एका महिलेचे नशीब पालटल्याची अनोखी घटना उघडकीस आली. तिने अचानक 4 कोटी 20 लाख 78 हजार रुपयांची लॉटरी जिंकली आणि हा जॅकपॉट तिचे अवघे आयुष्य बदलून टाकणारा ठरला. तिच्याबरोबर साहजिकच तिचे कुटुंबीयदेखील खूश झाले. डेब्स ऑर्चर्ड असे या महिलेचे नाव आहे.

डेब्स ऑर्चर्ड आपल्या कुटुंबीयांसह नॉर्वेजियन फोजर्डसमध्ये एका क्रूझचा आनंद लुटत होती. यावेळी डान्स करताना ती अचानक कोसळली आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला एक पाय काढावा लागणार असल्याचे समजले. यामुळे ती निराश होणे साहजिकच होते. मात्र तिच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. व्हीलचेअरवर बसून क्रुझवर परतत असताना तिला अचानक पीपल्स पोस्टकोड लॉटरीमधून फोन आला.

डेब्स याबाबत म्हणाली, 'जेव्हा मी केबीनकडे परतत होते, त्यावेळी बॅगेतील फोन वाजू लागला. मेडिकल सेंटरचा फोन असेल, असे प्रारंभी वाटले होते. अनोळखी नंबर होता. मी तो नंबर डायल केला आणि तो पीपल्स पोस्टकोड लॉटरीचा असल्याचे कळाले. वास्तविक मी 10 वर्षांपासून पोस्ट कोड लॉटरी खेळत आहे आणि 2015 च्या आसपास एका तिकिटावर मी 1 हजार डॉलर्स जिंकले होते. पण, इतकी मोठी रक्कम आता प्रथमच जिंकली आहे. यावेळी पैशाची उधळपट्टी न करता मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यावर भर देणार आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT