Latest

HBD Mohanlal : साऊथचे ‘अंबानी’ आहेत मोहनलाल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेते मोहनलाल (HBD Mohanlal) यांना साऊथचे सुपरस्टार म्हटले जाते. ४० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत, अभिनेत्याने ३४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मोहनलाल (HBD Mohanlal) हा व्यावसायिक कुस्तीपटू होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. मोहनलाल हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. मोहनलालने १९७८ साली 'थिरानोत्तम' या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट कधीही प्रदर्शित होऊ शकला नाही. आज त्याचा ६२ वा वाढदिवस आहे. त्याच्या लक्झरी लाईफविषयी माहिती आहे का? या खास दिवशी जाणून घेऊया, तो किती संपत्तीचा मालक आहे.

मोहनलालचा जन्म २१ मे, १९६० रोजी केरळमधील पथमथिट्टा जिल्ह्यातील एलांथूर येथे झाला. मल्याळम व्यतिरिक्त, मोहनलाल यानी हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ यासारख्या इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे सिनेजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या मोहनलालला इतरही अनेक छंद आहेत. तो अष्टपैलू आहे.

लक्झरी गाड्या

अभिनेता मोहनलालकडे ७.५ कोटींच्या जवळपास ६ आलिशान वाहने आहेत. यामध्ये BMW, Jaguar, Range Rover, Mercedes Benz सारख्या ब्रँडेड कारचा समावेश आहे.

मोहनलालचा दुबईतील बुर्ज खलिफा येथे फ्लॅट आहे. या इमारतीत २९ व्या मजल्यावर त्याचे घर आहे. २०११ मध्ये त्यानो हे घर विकत घेतले होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती २१२ कोटी रुपये आहे.

व्यवसायातून बिझनेस

मोहनलाल विश्वनाथन हे प्रसिद्ध भारतीय अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक, पार्श्वगायक, लेखक, नाटककार, टीव्ही होस्ट आणि चित्रपट वितरक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त मोहनलालचा रेस्टॉरंट आणि मसाल्यांच्या पॅकेजिंगचाही व्यवसाय आहे. त्याला 'साऊथचा अंबानी' असेही म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहनलाल सध्या एका चित्रपटासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये घेतात. इंडोर्समेंटसाठी तो ५० लाख रुपये घेतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT