Latest

अमृता यांना देवेंद्र फडणवीस वाटतात जिलेबी सारखे गोड…वाढदिवसानिमित्त ट्विटरवर खास पोस्ट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज (दि.22 जुलै) वाढदिवस. देशभरातून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश येत आहेत. फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत, खास शब्दात फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांमुळे तर कधी आपल्या ट्विटमुळे. सोशल मीडियावर त्या सक्रिय असतात. आज त्यांचे पती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता यांनी  फडणवीस यांना जिलेबी खाऊ घालतानाचा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडियावर फडणवीस यांना टॅग करत शेअर केला आहे. त्या फोटोबरोबर खास असा वाढदिवस संदेश दिला आहे.

विकासाचा गोडवा

अमृता यांनी आपल्या संदेशात लिहले आहे की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीस : असाही योगायोग

आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्याच बरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही वाढदिवस आहे. आणखी एक योगायोग देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांच्यात आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते तर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. तर आताच्या घडीला सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत तर विरोधी पक्षनेते हे अजित पवार हे आहेत. अजित पवार यांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT