Latest

Gopichand Padalkar : विखे पाटलांवर भंडारा फेकल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया म्हणाले, …नादी लागू नका

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोलापुरात धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा फेकण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना पडळकरांची जीभ मात्र घसरली, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये 'लांडग्या काकाच्या' नादी लागू नका, असे संबोधले आहे. (Gopichand Padalkar) त्यांच्या पोस्टवर राजकीय वर्तुळासह नेट भटक्यांनीही चर्चा सुरू केली आहे.

Gopichand Padalkar : विखे पाटील यांच्यावर भंडारा फेकला

एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी नियोजन बैठका घेऊन मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय विश्रामगृहात ते विविध नागरिकांचे निवेदन घेत होते. याच वेळी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांचे कार्यकर्ते सात रस्त्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन दिले. कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहे, लवकरात लवकर आरक्षण द्या, असे बोलत असताना अचानक खिशामध्ये हात घालीत कागदामध्ये गुंडाळून आणलेला भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर फेकला. येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले

भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच

राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर कार्यकर्त्यांकडून भंडारा फेकल्यानंतर एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच. भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!" असे राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

…काकाच्या नादाला लागू नका

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये. जर काहींनी तो मा. राधाकृष्णन विखे पाटील यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशिर्वाद समजावा.तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की 'लांडग्या काका'च्या नादाला लागू नका. आपण आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयात लढतोय, (Gopichand Padalkar  )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT