Latest

मुंबई : अखेर जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : करीरोड येथील गोविंदा पथकातील २० वर्षीय प्रथमेश सावंत या गोविंदाचा अखेर शनिवारी (दि.८) सकाळी मृत्यू झाला. तब्बल दीड महिन्यापेक्षा अधिक काळ प्रथमेशने मृत्यूशी झुंज दिली. पण सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यातच त्याचा अंत झाला. त्याच्या जाण्याने गिरणगावसह गोविंदा पथकामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दहीहंडी फोडताना थर कोसळल्यामुळे प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला निमोनियाही झाला होता. दरम्यान, सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळतात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, माजी नगरसेवक सचिन पडवळ व विभागातील नागरिकांनी केएम हॉस्पिटलजवळ गर्दी केली होती.

प्रथमेशच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक प्रथमेशच्या कुटुंबीयांना या अगोदरच ५ लाख रुपयांची मदत केली होती. तर शिवसेनेतर्फे संपूर्ण वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्यात आली होती. दरम्यान, विम्याअंतर्गत प्रथमेशच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिवसेनेने आग्रह धरला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT