Latest

FIFA WC 2022 : भारतात वर्ल्ड कप दिसणार ‘या’ चॅनेलवर!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेला (FIFA WC 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. २० नोव्हेंबरला रात्री ९.३० वाजता कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने या जागतिक स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत ३२ देशांचे संघ सहभागी झाले असून २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत सामने होणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेतील साम्यांचे थेट प्रक्षेपण, त्यातील संघ, ग्रुप आणि इतर काही रंजक गोष्टींविषयी सर्व काही जाणून घेऊयात…

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेतील ग्रुप (FIFA WC 2022)

ए ग्रुप : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
बी ग्रुप : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
सी ग्रुप : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
डी ग्रुप : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ई ग्रुप : स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
एफ ग्रुप : बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
जी ग्रुप : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
एच ग्रुप : पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ फॉरमॅट

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ त्यांच्या ग्रुपमधील इतर तीन संघांविरुद्ध सामना खेळणार आहे. प्रत्येक गटातील टॉप २ संघ राऊंड ऑफ १६मध्ये प्रवेश करतील. येथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ १६ मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये १६ पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

फुटबॉल विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक

ग्रुप स्टेजचे सामने २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. ३ ते ६ डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-१६ चे सामने होणार आहेत. त्यानंतर ९ आणि १० डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, १३ आणि १४ डिसेंबरला उपांत्य फेरी, १७ डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि १८ डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे. या सर्व सामन्यांसाठी ५ वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे सामने दुपारी ३.३०, सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.३०, ९.३०, १२.३० वाजता सुरू होतील.

कुठे होणार सामने?

हे सर्व सामने कतारच्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात ६४ सामने होणार आहेत. ६०,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या अल बायत स्टेडियमवर विश्वचषकातील पहिला सामना होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने कतारमधील आठ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. ८०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या लुसेल स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. मध्यपूर्वेत होणारा हा पहिलाच फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे.

लाइव्ह टेलिकास्ट  कुठे पाहाल?

Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण अधिकार आहेत. अशा परिस्थितीत स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. त्याच वेळी, VOOT Select आणि Jio TV वर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT