Latest

Fatima Sana Shaikh : फातिमाची कॅटवरही मात, हॉटनेसचा लावला तडका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी फातिमा सना शेखच्या (Fatima) सौंदर्यांचे अपरिमित वर्णन केले जाते. तिचा अभिनयचं नव्ह तर व्यक्तीमत्व आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांवार आधीच गारूड घातले आहे. दंगल मध्ये एका कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणारी ही अभिनेत्री मात्र रिअल लाईफमध्ये खूप सुंदर आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो पाहून तुम्ही तिला कमेंट तर द्यालचं. पण, कॅटरीनावरही तिने मात केल्याचं म्हटलं जात आहे. (Fatima)

अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. तिचे एकापेक्षा एक फोटो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की, फातिमाचा लूक इतका बदललाय. ती आणखी स्लिम ट्रीम आणि गॉर्जियस दिसतेय. लव्हेंडर आणि पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये पाहून तुम्ही तिला म्हणाल – व्वा, क्या बात है!

फतिमाच्या सौंदर्याच्या खूप चर्चा आहेत. तिचे स्पॉटेड फोटो व्हायरल होतात. फातिमा ३० वर्षांची आहे. ती चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकसाठी अधिक प्रसिद्ध आहे. तिने निवडक फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.

बालकलाकार म्हणून केला अभिनय

वयाच्या सहाव्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली आहे. अनेकांना वाटते की 'दंगल' हा फातिमाचा डेब्यू चित्रपट होता. पण, खूप कमी लोकांना कदाचित माहिती असेल की, तिने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने अगदी लहान वयात अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, फातिमाने चाची ४२० या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. नंतर 'वन टू का फोर' चित्रपटातही काम केले. मात्र, या चित्रपटानंतर ती १५ वर्षे मोठ्या पडद्यावर दिसला नाही. २०१२ मध्ये ती 'बिट्टू बॉस', 'टेबल नंबर २१' इत्यादी चित्रपटांतून पुनरागमन करायचे होते. पण यश मिळाले नाही.

थार चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसली फातिमा

अनिल कपूरचा 'थार' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ६ एप्रिलला रिलीज झाला होता. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अनिल कपूर एक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते. या चित्रपटात अनिल कपूरशिवाय त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही आहे..दरम्यान, चित्रपट 'थार'च्या स्पेशल सक्रीनिंगमध्ये फतिमा शेखने हॉटनेसचा तडका लावला होता. या स्क्रिनिंगमध्ये ती पांढऱ्या साडीत खूपच सुंदर दिसली. या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनी उपस्थिती दर्शवली होती. या इवेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनिल कपूर, फातिमा शेख, हर्षवर्धन कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक यांसारखे स्टार्स कार्यक्रमात सहभागी झाले होते. जर आपण फातिमा सना शेखबद्दल बोललो, तर यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची शिमर साडी परिधान केली होती. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT