Latest

Father’s Day Special: ‘सिंगल पेरेंट’ वडिलांसाठी ‘या’ आहेत काही टीप्‍स

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  खरं तर पालकत्वामध्ये आई आणि वडील यांची भूमिका (Father's Day 2022) समान आणि महत्त्वपूर्ण असते; परंतु एकट्या वडिलांनी पालकत्वाची भूमिका निभावणे हे खूपच आव्हानात्मक काम आहे. वडिलांनी मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या एकट्याने सांभाळणे अवघड असते. या आधुनिक युगात मुलांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे आणि त्यांचे चांगले संगोपन करणे हे खरंच अजिबात सोपे नाही. एकटे वडील पालकसुद्धा काही टिप्सच्या सह्याने खूप चांगल्या पद्धतीने पालकत्व निभावून मुलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतात.  (Father's Day 2022) पालकत्वाची भूमिका निभावणाऱ्या वडिलांसाठी येथे आम्ही काही टीप्‍स  देत आहोत. ज्यामुळे तुमचा पालकत्वाचा मार्ग  सुकर होण्यास मदत होऊ शकते.

मुलाच्या आईला वाईट म्हणणे टाळा

काही कारणाने तुमचे पत्नीशी भांडण झाले असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर मुलांसमोर त्यांच्या आईविषयी वाईट बोलू नका. यामुळे मुलांवर तुमच्या व्यक्तीमत्वाचा वाईट प्रभाव पडतो. आईबद्दल वाईट ऐकल्यानंतर ते मुलही तुम्हाला रागीट आणि भांडखोर स्वभावाचे समजू लागेल. काही दिवसांनंतर  ते तुमचा देखील तिरस्कार करु लागेल. त्‍यामुळे मुलांच्‍या आईविषयी नकारात्‍मक बाेलणे टाळा.

महिलांचा आदर करायला शिकवा

मुलांचे चांगले संगोपन करतानाच लहानपणापासूनच त्यांना स्त्रियांचा आदर करण्यास शिकवा. त्यांना घरात उपस्थित असलेल्या आजी, मावशी, काकू आणि ताई यांच्याशी प्रेमाने वागण्याचा सल्ला द्या. तसेच, कोणत्याही महिलेला वाईट वागणूक देऊ नका, असे शिकवा.

मुलांबरोबर स्वत:ची काळजी  घ्या

मुलांची काळजी घेणाऱ्या वडिलांनी (Father's Day 2022)  देखील स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत एकटे पालक असणाऱ्या वडिलांनी मुलांची काळजी घेण्यासोबतच स्वत: निरोगी जीवनशैलीचे देखील पालन करावे. त्यांनी आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा तसेच, आपल्या दिनचर्येत व्यायामाला देखील महत्त्वाचे स्थान द्यावे. कारण त्‍यांच्‍यावर मुलांची जबाबदारी असते. त्‍यामुळे त्‍यांनी मुलांबराेबरच कुटुंबातील वातावरण चांगल राहण्‍याचासाठी वडिलांनी आपल्‍या आराेग्‍याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

मुलांसाठी टाइम टेबल बनवा

मुलांना शिस्त शिकवून, तुम्ही तुमचे पालकत्व सोपे आणि परिपूर्ण बनवू शकता. मुलांचे खेळ आणि अभ्यासाची वेळ निश्चित करा. जेणेकरून मुले आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करतील. आठवड्याच्या शेवटी त्यांना बाहेर फिरायला नेण्यास विसरू नका.

मुलांना स्वातंत्र्य द्या

एकटेच पालक असणारे वडील हे त्यांच्या पालकत्वाबद्दल अनेकदा शंका निर्माण करतात. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी मुलांच्या प्रत्येक कृतीवर निरिक्षण ठेवतात. वडिलांच्या सतत लक्ष देण्याने मुले अस्वस्थ होऊ शकतात, म्हणून मुलांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. मुलांना एखाद्या गोष्टीत योग्य आणिअयोग्य यातील फरक सांगून त्यांना स्वतःचे निर्णय स्वत:ला घेऊ द्या.

संतुलित जीवन जगा

अनेकवेळा वडील मुलांच्या उत्तम भविष्यासाठी रात्रंदिवस कामात व्यस्त असतात. काही वडील मुलांच्या पालकत्त्वासाठी आपलं करिअर देखील पणाला लावतात; पण जरी तुम्ही एकटे पालक असाल, तर जीवनात असे करणे टाळा. तुमचे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन यामध्ये समतोल साधा आणि मुलांबरोबरच करिअरलादेखील तितकेच महत्त्व द्या. मुलांना वेळ द्‍या.  तुमचे काम आणि मुलांना देण्‍यात येणारा वेळ याची सांगड घाला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT