Latest

मोबाईल चार्जिंगवेळी वीज धक्क्याने अभियंता ठार

Arun Patil

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : मोबाईल चार्जिंग करताना श्रीपेवाडी (ता. निपाणी) येथील एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. आकाश शिवदास संकपाळ (वय 27) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. घटनेची नोंद बसवेश्वर पोलिसांत झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आकाश संकपाळ हा श्रीपेवाडी औद्योगिक वसाहत येथे असलेल्या शेतवडीतील घरात आई, वडील, भाऊ यांच्यासह राहात होता. तीन ते चार वर्षांपूर्वी त्याने बांधकाम क्षेत्रातील अभियंता पदवी संपादन करून तो या क्षेत्रात काम करत होता. गुरुवारी सकाळी तो कामावर कामगारांना सोडून घरी आला.

यावेळी कामावर जायचे म्हणून मोबाईल चार्जिंगसाठी लावताना विजेचा धक्का लागून तोे जागीच कोसळला. त्याला तत्काळ निपाणीतील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यानी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार, हवालदार श्रीशैल मळली यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT