Latest

Electric Car In UP : योगी सरकारचा मोठा निर्णय, इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास मिळणार १ लाख रुपयांची सूट

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी एका नव्या योजनेला मंजूरी दिली आहे. नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२२ नुसार जर कोणी नवी इलेक्ट्रिक वाहन विकत घेणार असेल तर त्याला मोठी सूट मिळणार आहे. एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असेल तर त्याला १ लाख रुपयांची सूट मिळणार आहे. (Electric Car In UP)

देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर वाढवण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार नवे इलेक्ट्रिक वाहन विकत घेतल्यास मोठी सूट देणार आहे. तर याबरोबरचं इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहनही देणार आहे. या धोरणानुसार तिसरी महत्त्‍वाची बाब ही आहे की, योगी सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनही उभे करणार आहे. (Electric Car In UP)

कार खरेदी केल्यास मिळणार एक लाखांची सूट (Electric Car In UP)

योगी सरकारच्या नव्या धोरणानुसार जर उत्तर प्रदेशमध्ये एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार असेल तर त्याला मोठी सूट मिळेल. ही सूट इलेक्ट्रिक दुचाकींपासून, तीन चाकी आणि कारसाठी लागू होणार आहे. (Electric Car In UP)

बस खरेदी केल्यास मिळणार २० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

इलेक्ट्रिक बस खरेदी केल्यास मोठी सूट देणार असल्याची घोषणा योगी सरकारने केली आहे. राज्यात सुरुवातीच्या ४०० इलेक्ट्रिक बस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देणार आहे. (Electric Car In UP)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT