Latest

Earthquak : तीन दिवसांपूर्वी ‘या’ भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवलेला भूकंपाचा अंदाज ठरला खरा! ट्विट करत दिली होती माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : तुर्कस्‍तान आणि सीरियामध्‍ये आज (दि. ६) पहाटे ७.८ रिश्टरचा भूकंप (Earthquak) झाला. या भूकंपाने दोन्‍ही देशांमध्‍ये हाहाकार उडाला आहे.  शेकडो इमारती जमीनदोस्‍त झाल्‍या असून, १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर हजारोजण गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यामुळे  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दरम्यान, या शक्‍तीशाली भूकंपाचा इशारा नेदरलँडमधील भूर्गभशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स यांनी तीन दिवसापूर्वीच ट्विट करत दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

भूर्गभशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तीन दिवसांपूर्वीच तुर्कस्‍तानमध्‍ये सोमवारी पहाटे भूकंप (Earthquak) होईल, असा अंदाज ट्विटरवरून वर्तविला होता.  या भूकंपासंदर्भातील (Earthquak)  ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, " नजीकच्या काळात दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सिरिया, लेबेनॉन या भागात ७.५ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे".  त्यांनी ट्वीटसोबत भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता. आज पहाटे त्‍यांनी वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

कोण आहेत फ्रँक हूगरबीट्स? (Frank Hoogerbeets)

३ फेब्रुवारीला ट्विट करत तुर्कस्‍तानमध्‍ये शक्‍तीशाली भूकंप होईल, असा अंदाज वर्तविणारे फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) हे चर्चेत आले आहेत. फ्रँक हूगरबीट्स हे मूळचे नेदरलँडचे रहिवाशी असून,  ssgeos या संस्‍थेत ते  भूर्गभशास्त्रज्ञ म्हणून काम करतात.

भूकंप कुठे नेमका झाला ?

युनायटेड जिओलॉजिकल सर्वेनं दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानमधल्या गाझियांटेप शहराजवळ नूर्दगी शहरापासून २६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. भूपृष्ठापासून जवळपास १४.१ किलोमीटर खाली या भूकंपाचे केंद्र आहे. या तीव्र धक्क्यामुळे तुर्कस्तानसह सिरियातही १३०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. गंभीर जखमींची संख्‍या अधिक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT