Latest

इयरफोनमुळे तरुणाईमध्ये बहिरेपणाचा संभवतो धोका

Arun Patil

वॉशिंग्टन : माणसाच्या सोयी-सुविधेसाठी निर्माण केलेल्या कोणत्याही उपकरणाचा तारतम्यानेच वापर करणे हितावह असते. 'अति सर्वत्र वर्जयेत्' हे याबाबतही लागू होते. नुकतेच 'बीएमजे ग्लोबल हेल्थ' प्रकाशित झालेल्या शोधामध्ये इयरफोन्सच्या दूरगामी परिणामाचा खुलासा करण्यात आला आहे. या माहितीनुसार, सुमारे एक अब्ज तरुण आणि छोट्या मुलांना इअरफोनच्या अतिवापराने बहिरेपणाचा धोका आहे.

इअरफोन लावून 'लाऊड' संगीत ऐकण्याच्या सवयीमुळे एक अब्ज लोकांना बहिरेपणाचा धोका संभवतो. या रिसर्च पेपरला अमेरिकेच्या मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनाच्या रिसर्चर्सने सादर केले आहे. रिसर्च पेपरच्या माहितीनुसार, याप्रकरणी सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे. ज्यामुळे लोकांचे होत असलेले नुकसान रोखता येईल.

या रिसर्चच्या माहितीनुसार, जवळपास 12.5 टक्के मुले आणि किशोरवयीन (जवळपास 52 लाख) आणि 17 टक्के तरुण (जवळपास 2.6 कोटी) जण ऐकण्याची क्षमता गमावून बसले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अन्य रिपोर्टमध्ये सांगितले की, जगभरात 43 कोटी लोकांना बहिरेपण आले आहे. जर तुम्ही त्या लोकांपैकी एक असाल जे खूप वेळ मोठ्या आवाजात इयरफोन किंवा हेडफोन्सचा वापर करीत असतात, तर तुमच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT