Latest

ई-शिवनेरीची एका महिन्यात तब्बल 2 कोटींची कमाई

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : प्रदुषणमुक्त प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-शिवनेरीला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मुंबई-पुणे आणि ठाणे-पुणे या मार्गावर 26 ई-शिवनेरी बस धावत आहेत. एका महिन्यात 48 हजार 520 प्रवाशांनी प्रवास केला असून यातून एसटीला 2 कोटींचा महसूल मिळाला आहे.

इंधनावरील खर्च कमी करण्यासोबतच प्रदुषण कमी करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात 100 ई – शिवनेरी बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैक्की 26 ई बस सध्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. 1 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे ते पुणे मार्गावर पहिल्या ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दादर-पुणे 19 मे रोजीपासून ई-शिवनेरीची सेवा सुरू झाली. पहिल्या दिवसापासून ई-शिवनेरीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एका महिन्यात 50 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

ई-शिवनेरीने ठाणे-पुणे व मुंबई-पुणे मार्गांवर 26 फेर्‍यांच्या माध्यमातून 48,520 किमी प्रवास करून 1 कोटी 98 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ई-शिवनेरीच्या आरामदायी व सुरक्षित सेवेमुळे प्रवासी वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे. परिणामी ई-शिवनेरी या बसला प्रवासी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT