Latest

Dhule : धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून ६९ जणांना विषबाधा

backup backup

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जेवणानंतर अचानक त्रास होत असल्याचे लक्षात येताच, 69 जणांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी सुमारे 600 तरूण आलेले आहेत. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सायंकाळी या केंद्रात फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यात 70 पेक्षा जास्त तरुणांनी सहभाग नोंदवला. जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास झाला नाही. पण, रात्री उशिरा एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या 69 प्रशिक्षणार्थींना मळमळ सुरू झाली आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापनास लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एकूण 30 तरुणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. उर्वरित तरुणांची प्रकृती उपचार मिळाल्याने सुधारली आहे.

या घटनेची माहिती कळाल्याने पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतली यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले की पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तरुणांनी केलेल्या जेवणाच्या अन्नाचे नमुने घेण्यात आले असून या अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे तसेच या प्रकाराची धुळे शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT