Latest

ठाकरे सरकारने निलंबित केलेले डीसीपी पराग मणेरे पुन्हा सेवेत, शिंदे सरकारचा निर्णय

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणात नाव आलेल्या पोलीस उपायुक्त पराग मणेरे (DCP Parag Manere) यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने निलंबित होते. त्यानंतर आता शिंदे सरकारने मणेरे यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. मुख्य गृह सचिवाच्या अध्यक्षतेखालील आढावा समितीने हा निर्णय घेतला आहे.

शासन आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर बदली झालेल्या पराग मणेरे यांना त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाणे, कल्याण आणि कोपरी पोलीस ठाणे, ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने शासन आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. पुढे मणेरे यांच्या निलंबनाचा आढावा सामान्य प्रशासन विभागातर्फे घेण्यात आला. यात शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १४ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मणेरे यांना शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची शिफारस सक्षम प्राधिकारी यांना केली होती. त्याला सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार मणेरे यांना त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच, त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून या आदेशान्वये शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT