Latest

congress working committee : काँग्रेस पक्षात होणार मोठे फेरबदल

अमृता चौगुले

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या वर्कींग कमिटीची (congress working committee) रविवारी दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. वर्कींग कमिटीची ही बैठक काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पाच राज्यांत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव (Assembly Election Results) पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या (congress working committee) संघटनात्मक निवडणुका सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहेत, परंतु नेतृत्वाबाबत वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्या वेळेपूर्वी होऊ शकतात, असे मानले जात आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा शुक्रवारी रात्री काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या जी – २३ (G-23) च्या काही नेत्यांची बैठक झाली.

काँग्रेसचे (congress working committee) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी झालेल्या बैठकीला मनीष तिवारी आणि इतर नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला फारसे काही करता आलेले नाही, तर पंजाबमध्ये खराब कामगिरीने सत्ता गमवावी लागली आहे.

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली, पण काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या. संपूर्ण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राहुल गांधींनी फार कमी प्रचार केला. काँग्रेसला राज्यात केवळ 2.4 टक्के मते मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये 380 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांची डिपॉझिट देखिल जप्त झाले आहे.

काँग्रेसच्या (congress working committee) पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच उच्च पातळीवर बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर उत्तर प्रेदश काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे इलेक्ट्रॉनिक मीडिया समन्वयक जीशान हैदर यांच्या नेतृत्वाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पंजाबमध्ये गटबाजी आणि कलहात अडकलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आम आदमी पक्षाने तेथे 92 जागा जिंकून मोठा दणका दिला आहे. काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे स्वत: निवडणुकीत पराभूत झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानवे लागले आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यताही एक्झिट पोलने वर्तवली होती. मात्र निकाल आल्यावर काँग्रेस खूपच मागे पडल्याचे दिसले. गोव्यातही काँग्रेसचे असेच हाल झाले. मणिपूरमध्येही काँग्रेस अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT