पुढारी ऑनलाईन डेस्क
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरुन महाराष्ट्राविषयी वक्तव्य केले होते. यावरुन मुलुंडमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपचे नेते मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर मोठया प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला.
मुलुंडमध्ये आज जगताप यांच्या नेतृत्त्वामध्ये काँग्रेसने आंदोलन सुरू केले होते. यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष सुरू झाला. आज सकाळपासूनच भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. काँग्रेसच्या या आंदोलनाला तोंड देण्यासाठी भाजपने शक्तिप्रदर्शन सुरु केले होते.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष निर्माण झाला. महाविकास आघाडीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. तसेच राज्यातील सरकारचा निषेध ही केला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेटिंग करून कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी यावेळी सर्वत्र बॅरिकेटिंग केले.
हे ही वाचलं का