Latest

हिजाब वादातच कर्नाटकातील कॉलेज आजपासून सुरू, दहावीच्या विद्यार्थिनींचा परीक्षेवर बहिष्कार

अनुराधा कोरवी

बंगळूर, बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: हिजाब वादामुळे बंद ठेवण्यात आलेली महाविद्यालये बुधवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे राज्यभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र हिजाब वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही. उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी मंगळवारीही अपूर्ण राहिली. ती बुधवारी पुढे सुरू राहणार आहे.

या वादावर मंगळवारी विधानसभेतही वादंग झाले. हिजाबवरून बेळगावातील सरदार हायस्कूलमध्येही मंगळवारी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थिनींनी वर्गात शिरताना हिजाब काढल्याने हा वाद मिटला.
दावणगिरीत हिजाब काढण्यास विरोध करून 23 विद्यार्थिनींनी वर्गावर बहिष्कार घातला आणि घरी परत फिरल्या.

तर शिमोग्यातील भद्रावती तालुक्यामधील दोडप येथे हिजाब परिधान केल्याप्रकरणी शाब्दिक चकमक झाली. सध्या दहावीची पूर्वतयारी परीक्षा घेण्यात येत आहे. अशा वेळी विद्यार्थिनींनी हिजाब घालून शाळेत प्रवेश केला. पण त्यांना गेटवरच अडवण्यात आले. न्यायालयीन आदेश असल्याने हिजाब काढून वर्गात प्रवेश करण्याची सूचना देण्यात आली. पण, विद्यार्थिनींनी हिजाब काढण्यास विरोध केला. गुलबर्गा येथे हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना शाळेत प्रवेश नाकारल्याने त्या घरी परतल्या.

8 वी ते 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सुमारे 80 विद्यार्थिनी गैरहजर राहिल्या. तेथील उर्दू शाळांमधील वर्ग रिकामे होते. जेवरगी तालुक्यातील शाळेमध्ये विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या होत्या. मात्र शिक्षकांनी हिजाब काढून वर्गात प्रवेश करण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनींनी हिजाब काढला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT