Latest

World best spicy food Vindaloo : CNN च्या २० चटकदार डिशमध्ये गोव्याची ‘विंदालू’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेव्हा जगातील सर्वांत उत्तम मसालेदार पदार्थांची गोष्ट येते तेव्हा आपल्याकडे सर्वांत चांगले गरम मसाले आणि त्याचबरोबर रुचकर पदार्थ आहेत. मसाल्याला एक दीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडातील सर्वासे मसालेदार खाद्यपदार्थांबद्दल पुस्तक लिहिणारे भारतीय लेखक सौरव दत्त म्हणतात, "मसालेदार जेवण, कमीत कमी मसालेदार अन्न, स्पष्टपणे देश आणि त्यांच्या पदार्थांवरून खूप काही विचार, संस्कृती सांगते." प्रत्येक मसाले पदार्थाची चव वेगळी असते. याच्या मिश्रणांनी स्वादिष्ट पदार्थ बनतात. (World best spicy food Vindaloo) आले, लसूण त्याची चव उत्तम बनवतात. मिर्ची गरम पदार्थ आहे. पण, तिच्या समावेशामुळे अन्नाची चव स्वादिष्ट होते. जगभरात याच मसाल्यांचा वापर करून अनेक डिशेस बनवले जातात. काहींची तर आपण नावेही ऐकलेली नसतात. आपल्या देशात तर अनेक राज्यपरत्वे संस्कृती पाहायला मिळते. प्रादेशिक पासून राज्यस्तरीय अनेक व्यंजनाची चव चाखायला मिळते. (World best spicy food Vindaloo)

अशीच एक २० वेगवेगळी डिशेसची यादी सीएनएनने रिलीज केली आहे. या यादीत जगभरातील अनेक देशांच्या डिशेसने अव्वल क्रमांक मिळवला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतातील दोन राज्यांच्या डिशेसने सीएनएनच्या यादीत स्थान मिळवलेय. विंदालू आणि चिकन चेट्टीनाड हे दोन पदार्थ समाविष्ट झाले आहेत.

विंदालू

गोव्यातील एक प्रसिद्ध पदार्थ विंदालू आहे. यास गोवन विंदालू असेही म्हणतात. हा पदार्थ पुर्तगाली किचनशी संबंधित होता. विंदालू पुर्तगाली शब्द विन आणि अहलो मिळून बनला आहे. याचा अर्थ दारू आणि लसुण असा आहे. त्यामध्ये डुकराचे मांस, कांदा, मिर्ची, लसुण, व्हिनेगर आणि इतर मसाले असतात. मसाल्यांचे मिश्रण मांसाला लावून रात्रभर ठेवतात. कधी-कधी अल्कोहोल ऐवजी व्हिनेगरचा वापर करतात.

चिकन चेट्टीनाड

दक्षिण भारतात एक म्हण आहे-eat like chettiar. भारताच्य़ा दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात चिकन चेट्टीनाड प्रसिध्द डिश आहे. यामध्ये अनेक मसाल्यांचा समावेश असतो. पारंपरिक चेट्टीनाड बनवताना आंबट मसाले जसे (anise, pepper, kalpasi stone flower and marati mokku (dried flower pods) काळी मिरी, मिर्ची, काली मिर्च, कल्पी दगड फूल, वाळलेल्या फूलांच्या शेंगा यांचा उपयग करतात.

चिकनच्या तुकड्यांना भाजलेल्या मसाल्यांमध्ये नारळाच्या खोबऱ्यात उकळले जाते. हे पारंपरिक पध्दतीने उकडलेले तांदुळ किंवा पातळ दक्षिण भारतीय पॅनकेकसोबत खायला दिले जाते. डोसा, पुऱ्या किंवा नानसोबत खायला दिले जाते.

तमिळ अन्न पदार्थांबद्दल सांगायचे जाले तर चेट्टीनाड रेसिपीज अधिक लोकप्रिय आहेत. हे पदार्थ तामिळनाडूच्या चेट्टीनाड क्षेत्रातून येतात. हे एक असे क्षेत्र आहे, जिथे चेट्टियार समुदायाचे वर्चस्व आहे. असं म्हटलं जातं की, हा भारतातील सर्वात तिखट पदार्थ आहे. चेट्टीनाड पदार्थांमध्ये जिरे, मेथी, बडिशेप, लवंग, तमालपत्र, हळदी, चिंचेचाही वापर केला जातो.

या दोन भारतीय पदार्थांसोबत जगभरातील विविध देशांती पदार्थांचाही सीएनएनच्या उत्तम पदार्थांच्या यादीत समावेश झाला आहे-

ते पुढीलप्रमाणे-

एगुसी सूप, नायजीरिया

सिचुआन हॉट पॉट, चीन

सोम टॅम, थायलंड

पिरी-पिरी चिकन, मोझांबिक आणि अंगोला

चेअरमॅन माओस ब्रेस्ड पोर्क, चीन

अयाम बेतुतू, इंडोनेशिया

बफेलो चिकन विंग्स, युनायटेड स्टेट्स

श्रिंप्स ऑगॉचिल्स, मेक्सिको

पॅड का प्राओ, थायलंड

बीफ रेंदांग, इंडोनेशिया आणि मलेशिया

डकडोरितांग, दक्षिण कोरिया

फाल करी, बर्मिंगहॅम, इंग्लंड

Penne all'arrabbiata, Italy

डोरो वाट, इथिओपिया

मापो टोफु, चीन

मेफ सेनेगल

चिली, युनायटेड स्टेट्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT