Latest

Gold Hallmark | सोने हॉलमार्कबाबत ज्वेलर्सना दिलासा, जुने दागिने विकण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्राहक मंत्रालयाने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. १ एप्रिलपासून हॉलमार्क (Gold Hallmark) क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नव्या नियमान्वये ३१ मार्च २०२३ नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनवर दागिने खरेदी-विक्री करता येणार नाहीत. १ एप्रिलपासून सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य असतील. दरम्यान, सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग नियम लागू करण्याच्या एक दिवस आधी केंद्राने ज्वेलर्सना दिलासा दिला आहे. १ जुलै २०२१ पूर्वी घोषित सोन्याच्या दागिन्यांचा जुना साठा किंवा सोन्याच्या कलाकृती ज्वेलर्सना ३० जून २०२३ पर्यंत जुन्या 'चार मार्क हॉलमार्किंग'सह विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबतचा आदेश ग्राहक व्यवहार विभागाने शुक्रवारी जारी केला आहे. हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्ट्स (दुसरी सुधारणा) ऑर्डर, २०२३ नावाच्या आदेशावर ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी स्वाक्षरी केली आहे. या आदेशाद्वारे विभागाने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स ऑर्डर, २०२० मध्ये एक नवीन तरतूद समाविष्ट केली आहे. यामुळे ज्वेलर्सना ३० जून पर्यंत त्यांच्याकडील जुन्या दागिन्यांचा साठा विकता येणार आहे. (Gold Hallmark)

सोन्याचा दर ६० हजारांवर

देशात आज शनिवारी (दि.१ एप्रिल) शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६० हजार रुपयांवर आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७४,५०० रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांचे कर, उत्पादन शुल्क आणि घडणावळ खर्च यामुळे सोन्याच्या किमती दररोज बदलत असतात. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, दिल्लीत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,१५० रुपये आहे. तर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१५० रुपये आहे. (Gold price today)

चेन्नईत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,६०० रुपये आहे. तर येथे २४ कॅरेटचा दर ६०,६५० रुपये आहे. मुंबई आणि कोलकाता येथे २२ कॅरेटचा दर ५५ हजार रुपयांवर आहे. तर येथे २४ कॅरेट सोन्याची विक्री ६० हजारांवर होत आहे. हैदराबाद, पुणे आणि केरळमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेटचा दर ५५ हजारांवर आहे. तर या ठिकाणी २४ कॅरेटचा दर ६० हजार रुपये आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल ३१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,७५१ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर २३ कॅरेटचा दर ५९,५१२ रुपये, २२ कॅरेट ५४,७३२ रुपये, १८ कॅरेट ४४,८१३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३४,९५४ रुपयांवर होता. चांदीचा दर प्रति किलो ७१,५८२ रुपयांवर होता.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT