Latest

राज्यातील टेक्सटाइल, मेडिकल व बल्क ड्रग पार्कला केंद्राने मान्यता द्यावी : मुख्यमंत्री

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास काम जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि केंद्राला फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अथॉरिटीची पहिली बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बंगळूर- मुंबई कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येईल व जमीन संपादन सुरू करण्यात येईल. राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता द्यावी. औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी 5542 कोटींची गुंतवणूक आली असून, 375 एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. यामुळे 3 लाख लोकांना रोजगार मिळेल. पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दिघी माणगाव औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येत असून 'एनआयसीडीसी'कडून त्वरित मदत झाल्यास विकासाला चालना मिळेल. 85 टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. कराराची तांत्रिक प्रक्रिया केंद्राकडून लवकर पूर्ण झाली तर तीन महिन्यांत उर्वरित भू संपादन पूर्ण करता येईल असेही ते म्हणाले. यावेळी वाराणसी – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम व्हावे यादृष्टीने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन देण्यात आले. तसेच काम पूर्ण झाल्यास या कॉरिडॉरमधील परिसराचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT