Latest

CBSE 10th Term 2 Result : 17 जुलैला निकाल घोषित होण्याची शक्यता?

backup backup

CBSE 10th Term 2 Result : सीबीएसई 10 बोर्ड टर्म 2 चा निकाल येत्या 17 जुलैपर्यंत घोषित होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी वर्तवली आहे. सीबीएसई 10 वी बोर्डाची टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 24 मे च्या दरम्यान एकूण 76 विषयांसाठी घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास 21 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी 8 लाख 94 हजार 993 विद्यार्थी आणि 12 लाख 21 हजार 195 विद्यार्थी बसले होते. परीक्षेनंतर विद्यार्थी 10वीच्या निकालासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

सीबीएसई बोर्ड या महिन्यात निकाल घोषित करण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 17 जुलैला निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या माहितीला बोर्डाकडून दुजोरा मिळालेला नाही. सीबीएसई बोर्ड त्याच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच निकाल घोषित करेल, अशी निश्चित माहिती सुत्रांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी results.cbse.in आणि cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहावा.

कसा पाहावा निकाल:

  • CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जा -results.cbse.nic.in
  • होमपेजवरील 'CBSE 10th term 2 results 2022' या लिंक वर क्लिक करा
  • रोल नंबर, जन्म तारीख आणि शाळेचा नंबर टाका
  • नंतर 'Submit' बटण वर क्लिक करा
  • तुमचा CBSE 10 वी चा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल
  • तुम्ही हे डाऊनलोड करून याची प्रिंट घेऊ शकता.

लक्षात घ्या

वेबसाइटवर एकाचवेळी हाय ट्रॅफिकमुळे गुणपत्रक लोड होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही पुढे दिलेल्या काही अन्य वेबसाइटवरही तुमचा निकाल पाहू शकता.

cbse.nic.in

results.cbse.nic.in

cbseresults.nic.in

याशिवाय विद्यार्थी त्यांचा निकाल एसएमएसद्वारे ही बघू शकतात, त्यासाठी फक्त टाइप करा – cbse10 (rollno) (sch no) (center no) आणि हा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवा. या निकालानंतर सीबीएसई बोर्ड टर्म 1 चा निकाल आणि टर्म 2 चा निकाल असे दोन्ही निकाल एकत्र पाहता येतील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT