पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात शहरातील सर्वात मोठ्या मशिदी जवळ ज (दि २) रोजी मोठा स्फोट झाला असून २० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या आधी स्फोट झाला, त्यात इमाम मुजीब उर रहमान अन्सारी ठार झाले. अन्सारी हा एक प्रभावशाली तालिबान समर्थक मौलवी होता जो त्याच्या ज्वलंत भाषणांसाठी प्रसिद्ध होता.