Latest

मिस्टर कर्नाटक 2022 : ‘मि. कर्नाटक’ शरीरसौष्ठव स्पर्धा 6 मार्चला

मोनिका क्षीरसागर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यस्तरीय 'मिस्टर कर्नाटक -2022' शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार दि. 6 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता कल्याणपुरा, उडुपी येथील माउंट रोसरी चर्च मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मांडवी बिल्डर्स उडुपी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली असून उडुपी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे.

  • बंगळूर : हर्ष हत्येमागे ईश्वरप्पा ; हरिप्रसाद विधान परिषदेत शिमोगा हत्येवरुन गदारोळ
    ही स्पर्धा 55,60, 65, 70, 75, 80, 85 व 85 हून अधिक वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे रुपये पाच हजार, चार हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. किताब विजेत्या स्पर्धकाला 25 हजार तर उपविजेत्या स्पर्धकाला 15 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. बेस्ट पोझरला पाच हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. वुमन स्पोर्ट्स फिजिक गटात विजेत्यांना अनुक्रमे रुपये 15 हजार, दहा हजार व सात हजार अशी बक्षिसे आहेत. मेन स्पोर्ट्स फिजिक गटात 10 हजार, आठ हजार व सहा हजार अशी बक्षिसे असून मास्टर गटात 40 ते 50, 50 ते 60 व 60 हून अधिक वयोगटात ही स्पर्धा होणार
    आहे.
  • बेळगाव : हिजाबबाबत आठवडाभरात निकाल

पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये पाच हजार, चार हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार तसेच किताब विजेत्याला साडेसात हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिव्यांग गटात विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये आठ हजार, सहा हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार अशी बक्षिसे आहेत. 6 मार्च रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्पर्धकांची वजने घेण्यात येणार आहेत, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव असोसिएशनचे कार्याध्यक्ष अजित सिद्धण्णावर यांनी कळविले आहे.

हेही वाचलत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT