Latest

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला निर्णायक यश तरीही कमलनाथ भयग्रस्‍त; म्‍हणाले, “भाजप राज्‍यात…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्‍या उत्‍साहाला उधाण आलं आहे. मात्र मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री कमलनाथ हे निर्णायक यशानंतरही भयग्रस्‍त आहे. त्‍यांनी आपल्‍या अनुभवावरुन कर्नाटकमधील सत्तेबाबत आपलं मत व्‍यक्‍त केले आहे. ( Karnataka Election Results 2023 )

मतमोजणी सुरु असताना कमलनाथ यांनी म्‍हटलं की, "कर्नाटकमध्‍ये निश्‍चित काँग्रेस सत्ता स्‍थापन करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र भाजप राज्‍यातील अन्‍य पक्षांच्‍या आमदारांना खरेदी करण्‍याचा प्रयत्‍न करेल. त्‍यांनी याची सुरुवात मध्‍य प्रदेशमधून केली होती. काँग्रेसला यश मिळत असल्‍याचे दिसत आहे. मात्र भाजप अन्‍य पक्षांच्‍या आमदारांना खरेदी करण्‍याचा प्रयत्‍न करु शकताे. भाजपने आमदार खरेदी करण्‍याची सुरुवात ही अरुणाल प्रदेशमधून केली होती. ती आताही सुरु आहे." ( Karnataka Election Results 2023 )

मध्‍य प्रदेशमध्‍ये काय घडलं होतं?

२०१८ मध्‍ये मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र २०२० मध्‍ये काँग्रेसचे नेते ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखालील आमदारांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. ज्‍योतिरादित्‍य शिंदे हे केंद्रीय मंत्री झाले तर मध्‍य प्रदेशमध्‍ये भाजपने शिवराजसिंह चौहान यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली सरकार स्‍थापन केले होते. त्‍यामुळे आता कर्नाटकमध्‍येही काँग्रेसची वाटचाल पूर्ण बहुमताकडे असली तरी भाजप राज्‍यात अन्‍य पक्षाचे आमदारांचे समर्थन मिळविण्‍यासाठी प्रयत्‍न करेल, अशी भीती कमलनाथ यांनी सतावत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT