Latest

भारत जोडो यात्रा : सोनिया गांधी यांच्‍यासोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधी म्‍हणाले, ‘जे प्रेम यांच्याकडून मिळायलय..’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज ( दि. २४ ) राजधानीत दाखल झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आई सोनिया गांधींसोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिले आहे की, 'मला त्यांच्याकडून मिळालेलं प्रेमच मी देशाला वाटत आहे'.

दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथून सात सप्टेंबर रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा शनिवारी सायंकाळपर्यंत तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. राहुल यांच्या दिल्ली दौऱ्यात सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोत कोरोना स्थिती लक्षात घेत, सोनिया गांधींनी फेस मास्क देखील लावला आहे.

सोनिया गांधी दुसऱ्यांदा भारत जोडो यात्रेत

भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही शनिवारी (दि.२४) दिल्लीतील भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. हे सर्वजण राहुल गांधींच्या बरोबर जाताना दिसले. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या यात्रेत सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी सोनिया गांधी यांनी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात पहिल्यांदा भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

थंडीत फक्त टी-शर्ट घालण्यावर प्रश्न

राहुल गांधींनी शनिवारी (दि.२४) आई सोनिया आणि बहीण प्रियंका यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी आई आणि बहिणीला मिठी मारली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर सोनिया गांधींनी राहुल गांधींना थंडीत फक्त टी-शर्ट घालण्यावर प्रश्न केला. यानंतर उत्तर न देता, राहुल गांधींनी त्याच्या आईचा हात हातात घेत, त्यांना प्रेमाने मिठी मारली. दरम्यान सोनिया गांधीही काही काळ भावूक झाल्या.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT