Latest

बेळगाव : औषधवाहू टेम्पोची झाडाला धडक, चालक ठार

निलेश पोतदार

खानापूर : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय सामग्री व औषधांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोची झाडाला धडक बसून चालक जागीच ठार झाला. आज (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रामनगर-धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक असणाऱ्या वन खात्याच्या विश्राम धामसमोर हा अपघात घडला. बंगळूर येथून गोव्याच्या दिशेने वैद्यकीय सामग्री घेऊन जाणाऱ्या ४०७ टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेच्या झाडाला टेम्‍पोची धडक बसली. त्यात चालक सय्यद निजाम (वय 19) रा. बेंगलोर हा जागीच ठार झाला. त्याच्याबरोबर असणारे माज शेख (वय 19) आणि तोहीर शेख (वय 19) दोघेही रा. बेंगलोर हे जखमी झाले आहेत.

ही धडक इतकी जोराची होती की, अपघातानंतर चालक निजाम याचा मृतदेह वाहनातच अडकून पडला आहे. लोंढा येथून क्रेन मागवण्यात आली असून, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे. याच मार्गावरील मुंडवाड क्रॉस नजीक सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहनच्या बळ्ळारी-पणजी बसला अपघात होऊन बस पलटी झाली. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. दोन्ही अपघात लोंढा पोलीस उपठाण्याच्या हद्दीत घडले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT