Latest

बैलपोळा : लाल मातीच्या बैलजोडीस असतो मान

सोनाली जाधव

हिंगोली,जवळाबाजार/पुढारी वृत्तसेवा : राज्यात शेतकरी बांधवाचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. आज (दि.१४) ठिकठिकाणी उत्साहात आयोजन करण्यात येत असते. पण लम्पी प्रादुर्भाव वाढत असल्याने घरोघरीच सण साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात घरोघरी आज मातीची  बैलजोडी, गाय, वासरू तयार करून पुजेस मांडतात.

बैलपोळा : लाल मातीच्या बैलजोडीस मान…

विशेषत: लाल मातीचा तयार केलेला बैलजोडी ग्रामीण मोठ्या प्रमाणात मान असतो. शहरी भागात  रंगीत तयार केलेला बैलजोडी मुर्ती विकत घेऊन बैलपोळास पुजा करतात. ग्रामीण भागातील बैलपोळा सण विविध माध्यमातून आगळा वेगळ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी लाल माती बैलजोडी, गाय, वासरू तयार करण्यासाठी बच्चे कंपनी सकाळीच शेतातुन लाल माती घेऊन येतात. घरोघरीच कुटुंबातील वयस्कर मंडळी लालमाती भिजवून त्याच्या पासून सुंदर बैल जोडी, गाय व वासरू तयार करतात. ग्रामीण भागात घरोघरी लालमातीचे बैलजोडी तयार करून बैल पोळास पुजेस ठेवतात.  आता ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी  लाल माती मिळणे अवघड झाला मुळे आता बाजार पेठेत विविध रंगीत बैल जोडी विक्रीस मिळत आहेत. तर ग्रामीण भागात आज सुद्धा लाल मातीची बैलजोडी गाय व वासरू तयार करून बैलपोळास पुजा करण्याची पंरपरा पाळतात.

हे ही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT