Latest

Nagpur Rape : घृणास्पद, आठ वर्षीय मुलीवर वडिलांनी केला अत्याचार

backup backup

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि नात्यांवरील विश्वासच उडवणारी घटना नागपुरात घडली. (Nagpur Rape) हुडकेश्वर पोलिस हद्दीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय विकृत आरोपीने आपल्या आठवर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करीत ७ वर्षीय पुतण्यासोबत अनैसर्गिक संभोग केला.

या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात भादंवी कलम ३७६ (अ, ब), (फ), २ (एन), ३७७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे (Nagpur Rape). आरोपी हा गणेश चतुर्थीपासून मुलीवर अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४० वर्षीय आरोपी, कथितरित्या एक ट्रान्सजेंडर अाहे. पत्नी लग्नानंतर काही वर्षांनी त्याला सोडून गेली. तो त्याचा मोठा भाऊ आणि वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. त्याचा भाऊ सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो आणि आई घरगुती कामे करते.

आरोपी त्याच्या ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करीत असताना त्याला त्याच्या आईने रंगेहाथ पकडले. अवृद्ध महिलेसह, पीडित मुलीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या संदर्भात तक्रार दाखल केली.

तपासा दरम्यान, हे समोर आले की आरोपी पूर्वी त्याच्या ७ वर्षांच्या पुतण्याचे अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करत होता. नंतर त्याने गणेशोत्सवापासून त्याच्या मुलीचे शोषण करणे सुरू केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT