Latest

कोरोनानंतर वाढताहेत त्वचेचे आजार; कुणाला नागीण तर कुणाची केस गळती

अमृता चौगुले

नरेंद्र साठे

पुणे : पुण्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोविड होऊन गेलेल्या काही नागरिकांमध्ये त्वचेचे आजार बळावले आहेत. मात्र योग्य उपचारांनी तेे बरेही होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अनेकांमध्ये केस गळतीचे आणि नागीण (हर्पीज लाबियालिस) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली खरी, परंतु आता कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये अशक्तपणा जाणवत आहे. वेगवेगळ्या व्याधींचा त्रास वाढत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागीण या रोगाची लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. त्वचेवर पुरळ येणे, लालसरपणा येणे, डोळ्यांभोवती तसेच नाक, ओठ यांसारख्या भागात त्वचारोग दिसून येणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. हे संक्रमण ज्येष्ठ नागरिकांत आढळून येत आहेत. या रुग्णांमधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

या आजारांचे प्रमाण जास्त …

हर्पीज लाबियालिस (नागीण) हा आजार ओठाच्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे चट्टे पडून आग होते. त्यामुळेही चट्टे उमटतात, शिवाय वेदनाही होतात. एचएसव्ही नागीण प्रकारापेक्षा हर्पीज जोस्टर हा नागिणीचा प्रकार कोरोनानंतर जास्त बघायला मिळाला आहे.

स्टिरॉइडच्या परिणामाकडे दुर्लक्ष करू नका!

कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टिरॉइड आणि अँटीव्हायरल औषधांच्या परिणामामुळे संधिवातासारख्या समस्या जाणवत आहेत. नागरिकांनी या समस्या जाणवल्यानंतर तातडीने तज्ज्ञांना दाखवावे.

नागीणचे प्रमाण वाढले होते. अंगाला खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले होते. तीन ते सहा महिने केस गळत होते. मात्र, हे तात्पुरत्या स्वरूपातील आहे. योग्य उपचार घेतल्यानंतर केस गळती थांबते.
                                                         – डॉ. नितीन चौधरी, वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT