Latest

fraud : तरुणाचा ठग्ज् ऑफ ‘फोन पे’ फंडा; सराफांना घातला लाखोंचा गंडा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तो ग्रॅज्युएट झाला.. काही दिवस कॅब चालवू लागला..पण कमी वेळात त्याला जास्त पैसे कमवायचे होते. त्यासाठी त्याने फोन पे द्वारे पेमंट केल्याचा बनाव ( fraud ) रचून सराफाच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या लंपास करण्यास सुरूवात केली. त्याची ही हेराफेरी अनेक दिवस चालली. मात्र काही सराफांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर तो पोलिसांच्या चानाक्ष नजरेतून सुटू शकला नाही. विशाल माणिक घोडके (वय.28,रा. होलेवस्ती उंड्री) असे या ठगाचे नाव आहे.

हडपसर पोलिसांनी 9 गुन्ह्यांचा छडा लावत घोडके याच्याकडून सोन्याचे दागिणे, एक चारचाकी गाडी असा आठ लाखाचा ऐवज जप्त केला. घोडके याने एडीट केलेला फोन पे चा स्क्रिन शॉट वापरून 14 लाख रुपयाहून अधिक ट्रान्जेक्शन तसेच 50 पेक्षा जास्त सराफांच्या दुकानात फसवणूक ( fraud ) करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला 6 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हडपसर येथील रामेश्वर वर्मा यांच्या सोनक ज्वेलर्समधून 24 जानेवारी रोजी आकाश तुपे नावाच्या व्यक्तीने पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी खरेदी केली. त्यानंतर फोन पे द्वारे पैसे दिले असे भासवून फसवणूक ( fraud ) केली होती. याप्रकरणी, हडपसर पोलिस ठाण्यात वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहरातील विविध भागात देखील अशाचप्रकारे अनेक सराफांना गंडा घालण्यात आला होता. तांत्रीक विश्लेषनाद्वारे तपास करत असताना, कर्मचारी प्रशांत दुधाळ व सुरज कुंभार या दोघांना आरोपी आकाश तुपे नसून विशाल घोडके असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला उंड्री परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदम्यान घोडके याने मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक सरफांना अशाप्रकारे गंडा घातल्याचे सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, शाहीद शेख यांच्या पथकाने केली.

अशी करत असे फसवणूक ( fraud )

घोडके हा उच्चशिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे. लग्नात गिफ्ट देण्यासाठी तो अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात जात असे. पाच ग्रॅमच्या पुढची तो अंगठी घेत नव्हता. अंगठी खरेदी केल्यानंतर पैसे देताना फोन पे द्वारे पैसे देत असे. मात्र खात्यावर पैसे नसल्यामुळे ट्रान्जक्शन फेल होत होते. परंतू ट्रांन्जक्शन फेल झाले तरी फोन पे द्वारे एक मेसेज येतो. तो स्क्रिन शॉट क्रॉप त्यावरील युटीआर क्रमांक देत असे. त्यामुळे सराफाला वाटे पेमेंट झाले आहे.

मात्र पेमेंट झाले तरी व नाही झाले तरी मेसेज येतो. त्या मेसेजवरील पेमेंट स्कॅन्सल झाल्याचा मेसेज क्रॉप करून तो खाली आलेला युटीआर क्रमांक सराफांच्या हवाली करत असे. सराफांना विश्वास वाटावा म्हणून तो ज्या परिसरात जात असे तेथील स्थानिक गाववाल्याचे आडनाव धारण करत असे. काही हुशार सराफांनी त्याला दागिणे दिले नाहीत. मात्र ज्यांना माहिती नाही ते अलगद जाळ्यात अडकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT