Latest

Viral Video : किती हा क्रूरपणा! पाळीव मादी कुत्र्याला भेटत होता भटका कुत्रा, मालकानं ठार मारलं!

दीपक दि. भांदिगरे

ग्वाल्हेर; पुढारी ऑनलाईन

Viral Video : एका धक्कादायक घटनेत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मधील एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. यामुळे कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सदर व्यक्ती कुत्र्याला काठी आणि दगडाने क्रूरपणे मारहाण करत असल्याचे दिसते. मारहाणीनंतर कुत्र्याची हालचाल थांबल्यानंतर सदर व्यक्तीने त्याला मारहाण करणे थांबवले नाही. ही घटना ग्लाल्हेरमधील चार शहर भागातील आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे.

एका वृत्तानुसार, एक भटका कुत्रा पाळीव मादी कुत्र्याला (pet female dog) रोज भेटायला येत होता. ते रोज एकत्र खेळायचे. पाळीव कुत्र्याच्या मालकाने अनेकवेळा त्याला काठीने हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तरीही तो तिला भेटायला येत होता. गेल्या बुधवारी गल्लीत भटक्या कुत्र्यांची झुंड आली होती. त्यात हा कुत्रादेखील होता. तो मादी कुत्र्याजवळ येताच त्याला मालकाने रागाने काठीने बडवले. यामुळे कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. त्यावर तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याने त्याच्या डोक्यात दगड घातला. स्थानिक लोकांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टराला बोलावले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण तोपर्यंत कुत्र्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरातील पाळीव प्राण्यांच्या मालकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. बंटी बैस असे संशयिताची ओळख समोर आली आहे.

कुत्र्याचे लिंग कापले….

दरम्यान, मुंबईतील अंधेरीत २५ डिसेंबर रोजी अशाच एक प्राण्याच्या क्रुरतेची घटना समोर आली होती. एका अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास कुत्र्याचे लिंग कापल्याचे आढळून आले होते. समागमाच्या वेळी कुत्र्याचा अवयव कापला गेला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर सदर कुत्र्याला परेल येथील बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स (SPCA) येथे नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीचे ऑपरेशन करून कुत्र्याचे प्राण वाचवले. या प्रकरणी प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT