Latest

राजगुरूनगर येथे जुन्या घराची भिंत पडून मजुराचा मृत्यू

अमृता चौगुले

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा…" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गजबजलेल्या आझाद चौकात रविवारी (दि.१६) दुपारी ५ वाजता जुन्या घराची भिंत पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जुन्या घराची वीट, दगड मातीची भिंत अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झाला. विजय वाडेकर (वय ४०, रा. चांडोली, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. दुसरा मजूर अत्यवस्थ असून येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुनील (वय ३०, रा. लातुर) असे गंभीर जखमी असलेल्या मजुराचे नाव आहे.

राजगुरूनगर शहरातील आझाद चौकातील जवळपास ७० वर्षांपूर्वीचे हे काम असेल. नवीन बांधकाम करण्याच्या हेतूने जुने पडझड झालेले घर काढण्यासाठी सकाळपासून दोन मजूर काम करीत होते. दोन मजली दगड, वीट आणि मातीच्या कामाचा पहिला लाकडी आधाराचा मजला काढला. खालील काम सुरू असताना दुपारी पाचच्या सुमारास दोनमजली भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दोघेजण गाडले गेले.

राजगुरूनगर मधील आझाद चौकात व लगतच्या नेहरू चौकातील युवकांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एका मजुराला जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. वल्लभ कौदरे, पार्थ व्यास, सचिन सावंत, अभिषेक जगताप, स्वप्नील भालेराव, सागर सैद, बापूसाहेब सातकर, रंगनाथ सुतार आदींनी मदतकार्य केले.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="ASC" orderby="post_date" view="list" /]

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT