Latest

मध्‍य तुर्कीत पुन्‍हा भूकंप, पुनर्बांधणी सुरु असताना पुन्‍हा निसर्गाचा प्रकोप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य तुर्कीला आज पुन्‍हा एकदा भूकंपाचा धक्‍का बसला. ५.३ रिश्‍टर स्‍केल भूकंपामुळे नागरिक धास्‍तावले आहेत. शनिवारी मध्‍य तुर्की प्रांतातल निगडे येथे ५.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्र बिंदू निगडेजवळ होता, असे तुर्कीतील आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाने म्‍हटले आहे. दरम्‍यान, या भूकंपामुळे जिवित वा वित्त हानी झाल्‍याचे वृत्त नाही.

भूकंपबळींची संख्या ५० हजारांवर पोहोचली

तुर्कीत शक्‍तीशाली भूकंपाने अपरिमित जीवित आणि वित्‍तहानी झाली आहे. तुर्कस्‍तान आणि सीरियामधील मृतांची एकत्रित संख्या ५०,००० वर पोहोचली आहे. तर 5,20,000 अपार्टमेंट्स असलेल्या 1,60,000 इमारती कोसळल्या आहेत, असा अहवाल रॉयटर्सने दिला आहे.

दक्षिण तुर्कीत झालेल्या भूकंपामुळे अजुनही लोकांचे मृतदेह समोर येत आहेत. शेजारच्या सीरियामध्ये मृतांची संख्या वाढली आहे. मदत आणि बचाव कार्यानंतर आता जीव वाचण्याची आशा फार कमी आहे. तसेच अशा स्थितीत आता बचावकार्य थांबण्याची शक्यता असल्याचेही आपत्ती व्यवस्थापनाने म्‍हटले आहे.

बचावकार्य बंद झाल्यानंतर ढिगारा त्वरीत हटवला जाईल. यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह समोर येऊ शकतात, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये ५०,००० लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर लाखो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. जगभरातून मदतीचा ओघ सुरू असला तरी या दोन्ही देशांमध्ये भरून न येणारे मानवी आणि नैसर्गिक हानी झालेली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT