मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात एक नवा शब्द वारंवार ऐकू येतो, तो म्हणजे टॅरिफ युद्ध. विशेषतः अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर हा शब्द चर्चेत आला. पण नेमकं हे टॅरिफ युद्ध म्हणजे काय? सविस्तर जाणून घेवूया,
What Is Tariff War
जेव्हा दोन देश एकमेकांच्या आयात केलेल्या वस्तूंवर जाणीवपूर्वक अधिक कर (टॅरिफ) लावतात, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसराही देश तसाच टॅरिफ वाढवतो, तेव्हा त्या दोघांमध्ये सुरू झालेल्या या आर्थिक संघर्षाला टॅरिफ युद्ध असे म्हटले जाते.
हे युद्ध बंदुका किंवा क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने लढले जात नाही, तर व्यापार आणि कर याच्या माध्यमातून लढले जाते. या संघर्षात दोन्ही देश एकमेकांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी
व्यापारातील असंतुलन दूर करण्यासाठी
राजकीय किंवा धोरणात्मक दबाव निर्माण करण्यासाठी
वस्तूंचे दर वाढतात:
वाढलेले टॅरिफ ग्राहकांवर भार टाकतात आणि आयात केलेल्या वस्तू महाग होतात.
व्यापारात अस्थिरता:
आयात-निर्यातीवर परिणाम होतो आणि व्यापारातील विश्वास कमी होतो.
उद्योगांवर परिणाम:
काही कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते, तर काही कंपन्या त्यांच्या वस्तू निर्यात करू शकत नाहीत.
ग्लोबल इकॉनॉमीवर परिणाम:
मोठ्या देशांतील टॅरिफ युद्धाचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो.
2018-2020 दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यात मोठे टॅरिफ युद्ध झाले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या शेकडो वस्तूंवर कोट्यवधी डॉलरचे टॅरिफ लावले. यामुळे जागतिक व्यापारात मोठी उलथापालथ झाली.
टॅरिफ युद्ध हे आर्थिक क्षेत्रातील एक प्रकारचे संघर्ष आहे, जे कोणत्याही देशाच्या व्यापार धोरणावर आणि नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करू शकते. त्यामुळे अशा युद्धांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे.