Nobel Peace Prize 2025 
आंतरराष्ट्रीय

Nobel Peace Prize 2025: शांततेसाठीचे नोबेल 'मारिया कोरिना माचाडो' यांना जाहीर

Maria Corina Machado news: लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामामुळे त्यांना 'व्हेनेझुएलाची आयर्न लेडी' म्हणूनही ओळखले जाते

पुढारी वृत्तसेवा

व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या त्या भूमिगत (in hiding) आहेत. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामामुळे त्यांना 'व्हेनेझुएलाची आयर्न लेडी' म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वी त्यांचे नाव टाइम मासिकाच्या '२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती' (The 100 Most Influential People of 2025) च्या यादीतही समाविष्ट होते.

नोबेल समितीने केले कौतुक

नोबेल पुरस्कार समितीने हा पुरस्कार जाहीर करताना सांगितले की, माचाडो यांना व्हेनेझुएलातील लोकांसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या 'अथक कार्याबद्दल' (tireless work) सन्मानित करण्यात येत आहे. तसेच, 'हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्याच्या त्यांच्या संघर्षासाठी' (struggle to achieve a just and peaceful transition from dictatorship to democracy) हा पुरस्कार देण्यात येत आहे.

शांतीच्या निर्भीड आणि समर्पित चॅम्पियन

मारिया कोरिना माचाडो यांचे कौतुक करताना समितीने त्यांना 'शांतीच्या निर्भीड आणि समर्पित चॅम्पियन' (brave and committed champion of peace) असे म्हटले आहे. 'वाढत्या अंधारात त्या लोकशाहीची ज्योत तेवत ठेवत आहेत,' असेही समितीने नमूद केले.

'सुमाते' (Súmate) या संस्थेच्या संस्थापिका

व्हेनेझुएलाची हुकूमशाही राजवट राजकीय कार्य अत्यंत कठीण करते. लोकशाही विकासासाठी समर्पित असलेल्या 'सुमाते' (Súmate) या संस्थेच्या संस्थापिका म्हणून, माचाडो यांनी २० वर्षांपूर्वी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवाज उठवला. राजकीय पदावर असताना आणि त्यानंतर संस्थांना दिलेल्या त्यांच्या सेवेत,माचादो यांनी न्यायालयीन स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी आवाज उठवला आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT