पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील इराण-समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहविरोधातील हल्ले आणखी तीव्र केले आहेत. इस्त्रालयने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवादी सेंटरवर हल्ला केला. हे कमांड सेंटर सालाह घंडूर हॉस्पिटलला लागून असलेल्या मशिदीमध्ये होते, अशी माहिती इस्रायली सैन्याने आज (दि. ५ ऑक्टोबर) दिली.( Israel-Lebanon Conflict)
इस्त्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "गुप्तचरांच्या निर्देशानुसार रात्रभर हवाई दलाने हिजबुल्लाहच्या दहशतवादी सेंटरला लक्ष्य केले. आम्ही केलेला हल्ला अचूक होता. इस्त्रायली हल्ल्याने लेबनॉनच्या उत्तरेकडील त्रिपोली शहरावर प्रथमच हल्ला केला आहे. हिजबुल्लाहचे दहशतवादी मागील एक वर्षापासून सीमेवर गोळीबार करत आहेत. हे दहशतवादी गाझा युद्धावर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ काम करत आहेत."
हमासने शनिवारी सांगितले की, इस्रायली हल्ल्यात त्रिपोलीतील निर्वासित शिबिरात एक कमांडर ठार झाला. कमांडर सईद अत्ताल्लाह अली, त्याची पत्नी आणि दोन मुली"बेदवी कॅम्पमधील त्याच्या घरावर झिओनिस्ट बॉम्बस्फोटात ठार झाले, असे हमासने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान. हिजबुल्लाह इस्लामिक हेल्थ कमिटीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सालाह घंडौर हॉस्पिटलने म्हटलं आहे की, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ९ वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील बहुतांश गंभीर जखमी आहेत.