चीन बुधवारी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. X/twitter
आंतरराष्ट्रीय

चीनची पुन्हा कुरापत; पॅसिफिक महासागरात आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनने १९८०नंतर प्रथमच पॅसिफिक महासागरात आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. अमेरिकेत होत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेआधीच चीनने ही चाचणी घेतली आहे. चीनने या चाचणीमुळे जगाची सुरक्षा धोक्यात आणल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची चाचणी घेतना त्या परिसरातील राष्ट्रांची परवानगी घ्यावी लागते, त्यामुळे या चाचणीचे गांभीर्य आणखी वाढलेले आहे. China ICBM

चीनच्या वेळेनुसार आज सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली, तसेच ही चाचणी यशस्वी ठरली असे चीनने म्हटले आहे. या क्षेपणस्त्रांवर डमी 'वॉरहेड' बसवण्यात आली होती. वॉरडेह म्हणजे क्षेपणस्त्रांचा स्फोटके असणारा भाग, ही स्फोटके अण्विकही असू शकतात. चीनने ही चाचणी नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

China ICBM |१९८० नंतर प्रथमच पॅसिफिक महासागरात चाचणी

चीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी देशांतर्गत वाळवंटात घेत असते. पण १९८०नंतर पहिल्यांदाच ही चाचणी पॅसिफिक महासागरात घेतली गेली आहे, त्यामुळे तज्ज्ञांची चिंता वाढलेली आहे.

ली कुआन इव्ह स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीतील प्राध्यापक ड्रेव थाँम्पसन X पोस्टमध्ये म्हणतात, "चीनचा दावा आहे की या क्षेपणास्त्राचे टार्गेट कोणतेही राष्ट्र नव्हते. पण सध्या जपान, फिलिपाईन्स आणि तैवानसोबत चीनचे संबंध ताणलेले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. इतर राष्ट्रांवर दहशत निर्माण करण्यासाठी ही चाचणी पुरेशी आहे." तर अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक जॉन रिज यांच्यामते चीनचा उद्देश अमेरिकेला 'संदेश' देणे हा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT