Creative Commons Attribution-Share Alike 4.0
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशचे मासळीवरून राजकारण; 'या' खास माशाची भारतातील निर्यात थांबली

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसेच ती जगभरात प्रसिद्धही आहे. दुर्गापूजेच्या काळात बंगाली माणसाच्या घरी हमखास पद्मा हिलसा प्रकारच्या माशाचे कालवण बनवले जाते. हा मासा बांगलादेशातून पश्चिम बंगलामध्ये दुर्गापूजेच्या काळात पाठवला जाण्याची प्रथा शेख हसिना यांनी सुरू केली होती. पण आता शेख हसिना पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर सध्याच्या हंगामी सरकारने हा मासा भारतात पाठवता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. (Bangladesh Hilsa Fish Diplomacy)

शेख हसिना यांची Hilsa Fish Diplomacy

बंगलादेशी पद्मा हिलसा हा भारताता सापडणाऱ्या माशांच्या जातीपेक्षा अधिक चविष्ट मानला जातो. बंगलादेशात हा मासा सर्वाधिक सापडतो. तसेच या माशाला फार मोठी मागणी बंगलादेशात असते. त्यामुळे २०१२ ते २०२० या माशाची निर्यात करण्यास बंगलादेशात बंदी होती. पण शेख हसिना यांनी भारताला याला अपवाद केले होते. (Hilsa Fish Diplomacy)

भारत आणि बंगलादेश यांच्यात मुत्सद्देगिरीत हा मासा नेहमी महत्त्वाचा भाग राहिला आहे. १९९६ला हसिना यांनी तत्कालिन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना हे मासे भेट दिले होते. तसेच आताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही हा मासा त्यांनी भेट दिला होता. २०१९मध्ये दुर्गापूजेच्या काळात हसिना यांनी पश्चिम बंगलामध्ये ५०० टन पद्मा हिलसा मासा पाठवण्यास परवागनी दिली होती. तर २०२३मध्ये ३,९५० टन मासा भारतात पाठवण्यात आला होता, असे इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे.

स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी निर्णय

बंगलादेशाच्या मत्स्य विभागाच्या सल्लागार फरिदा अख्तर म्हणाल्या, "स्थानिक बाजारात या माशाला मोठी मागणी आहे. स्थानिकांना पुरेसे मासे मिळाव्यात यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे." (Hilsa Fish Diplomacy)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT