शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बंगालदेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. pudhari1
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Violence : शेख हसीना समर्थक २४ जणांची जाळून हत्या, बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bangladesh Violence : शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बंगालदेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. ढाका येथे एका घटनेत हसीना यांच्या पक्षाच्या समर्थकाचे हॉटेल दंगलखोरांनी पेटवून दिले असून यात २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हसीना यांच्या अवामी लिग या पक्षाचे जिल्हा सचिव असलेले शाहीन चक्कलदार यांच्या मालकीचे हॉटेल जोशोर जिल्ह्यात आहे. जबिन इंटनॅशनल असे या हॉटेलचे नाव आहे. दंगलखोरांनी हे हॉटेल आज पेटवून दिले. यामध्ये हॉटेलमधील लोकांचा मृत्यू झाला आहे.

जोशोर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे WION या वेबसाईटने म्हटले आहे. अवामी लिग पक्षाला विरोध करणाऱ्या जमावाने आधी हॉटेलचा पहिला मजला पेटवून दिला. त्यानंतर हे हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याशिवाय ढाकामध्येही अवामी लिग पक्षाच्या समर्थकांचे दुकाने, घरे इतर अस्थापनांना दंगलखोर लक्ष्य करत असल्याचे या बातमीत म्हटले आहे.

शेख हसीना यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात नव्याने हिंसाचार सुरू झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT