आंतरराष्ट्रीय

एकीकडे ‘इच्छामरण’ तर दुसरीकडे ‘विश्वविक्रम’ 

Pudhari News

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

काही आठवडयांपूर्वी ठाण्यातील एका आजी-आजोबांनी जवळचे कोणी नसल्याने इच्छामरणाची मागणी केली होती. संपूर्ण महाराष्ट्र या मागणीने व्यथीत झाला होता. याच दरम्यान ऑस्ट्रेलियामधून एक अशी बातमी आली की त्या बातमीने अशा इच्छामरण मागण्यापर्यंत निराश झालेल्या बुजुर्गांसाठी प्रेरणा नक्की मिळेल.

ऑस्ट्रेलियातील ९९ वर्षाचे बुजुर्ग पण, 'इच्छाशक्ती तरूण' असलेले जलतरणपटू जॉर्ज कॉरॉनेस यांनी ५० मीटर फ्रि स्टाईल प्रकारात विश्वविक्रम नोंदवला आहे. त्यांनी ५६.१२ सेकंद इतकी वेळ नोंदवून ९९व्या वर्षी विश्वविक्रम करुन सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या पूर्वी हा विश्वविक्रम कॅनडाच्या जेरिंग टिमरमॅन यांच्या नावावर होता. त्यांनी २००९ ला ५० मीटर फ्रि स्टाईल प्रकारात १ मिनिट आणि १६.९२ सेकंद वेळ नोंदवत विश्वक्रिमाची नोंद केली होती. 

कॉमनवेल्थ गेम्सच्या निवड चाचणी स्पर्धेत १०० ते १०४ वयोगटात ९९ वर्षाचे जॉर्ज कॉरॉनेस हे एकमेव खेळाडू होते. त्यामुळे सामना होणे शक्य नव्हते. पण, आयोजकांनी त्यांना या वयोगटातील विश्चविक्रम मोडण्याची संधी दिली आणि त्यांनी या संधीचा फायदा उठवत विश्वविक्रम नोंदवला. आश्चर्याची बाब म्हणजे जॉर्ज कॉरॉनेस हे ८०व्या वर्षी पोहायला शिकले आहेत. 

एकीकडे सातत्याने होत असलेली इच्छामरणाची मागणी आणि ९९ व्या वर्षी नोंदवण्यात आलेला विश्वविक्रम या दोन घटनांकडे पाहिले असता आपल्याला असे नक्की म्हणावे लागेल की जिथे निराशा आहे तेथे आशाही असतेच, मार्ग बंद होत नाहीत ते बदलतात, जीवन संपवणे हा मार्ग नाही, ते जगण्याच्या पध्दती बदलता येते. आणि जेवढे आयुष्य लाभले आहे ते आनंदात जगता यते हे या ९९ वर्षाच्या विश्वविक्रमी 'तरूणा'कडून आपण शिकायला हवे. 
 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT