इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटानंतर आपत्कालीन आणि बचाव पथके दुर्घटना स्‍थळी धाव घेत मदतकार्य सूरु केले. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

इराणमध्‍ये कोळसा खाणीत भीषण स्‍फोट,५१ ठार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्‍या ५१ झाली आहे. तर २० जण जखमी झाले आहेत, असे वृत्त गाेल्‍फ न्‍यूजने दिले आहे. ( Iran coal mine blast )

इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे 540 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या पूर्व इराणमधील तबासमधील कोळसा खाणीत शनिवारी (दि.२१ सप्‍टेंबर) रात्री कोळसा खाणीत स्‍फोट झाला. मिथेन वायूच्या गळतीमुळे झालेल्‍या दुर्घटनेवेळी सुमारे ७० कामगार खाणीत काम करत होते. प्रशासनाने आपत्कालीन आणि बचाव पथके तत्‍काळ स्फोटाच्या ठिकाणी पाठवली.

इराण दरवर्षी सुमारे 3.5 दशलक्ष टन कोळशाचा वापर करतो; परंतु दरवर्षी केवळ 1.8 दशलक्ष टन कोळसा काढतो. उर्वरित आयात केले जाताे. याचा बहुतांश वापर देशातील पोलाद गिरण्यांमध्ये केला जाताे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT