दोनशे किलो भेसळयुक्त बडिशेप जप्त. Pudhari File Photo
गोवा

दोनशे किलो भेसळयुक्त बडिशेप जप्त

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : येथील नव्या बसस्थानकावर यापूर्वी पनीर आणि तळलेला भेसळयुक्त कांदा जप्त करण्यात आला होता. शुक्रवार, दि. 20 रोजी राज्यात भेसळयुक्त बडिशेप येत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला असून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 200 किलो भेसळयुक्त बडिशेप म्हापसा बसस्थानकात जप्त केली.

म्हापसा येथील नव्या बसस्थानकावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापेमारी करत तब्बल 200 किलो भेसळयुक्त बडिशेप जप्त केली. या बडिशेपची किंमत 74 हजार रुपये आहे. ही बडिशेप पुण्याहून गोव्यात आणल्याची माहिती समोर आली असून, यापूर्वी पुणे आणि तत्सम ठिकाणहून बनावट पनीर व इतर खाद्यपदार्थ गोव्यात आले होते.

शुक्रवारी सकाळी अन्न व औषधे प्रशासनाकडून हा छापा टाकण्यात आला. ही भेसळयुक्त बडीशेप राज्यात विविध ठिकाणी असलेल्या हॉटेल, दुकाने व होलसेल तसेच घाऊक विक्री दुकांनात विक्रीसाठी पाठवण्यात येणार होते. यासोबतच इतर काही खाद्यपदार्थही एफडीएने जप्त केले. यात ब्रेडचा समावेश होता. या ब्रेडच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख नव्हती. रेस्टॉरंटमध्ये या ब्रेडचा पुरवठा केला जाणार होता. शिवाय काही प्रमाणात मटण देखील जप्त केले. अन्न व औषधे प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, शैलेश शेणवी, अमित मांद्रेकर, लेनिन डिसा व साईनाथ मांद्रेकर या पथकाने ही कारवाई केली.

बडिशेपला प्रक्रिया केलेला रंग

जप्त केलेल्या बडिशेपचे नमुने घेतले असून बडिशेपला प्रक्रिया केलेला रंग चढविण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर अन्न व औषधे प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT