पणजी: राज्य सरकारने महत्त्वाच्या नऊ संस्था आणि महामंडळांच्या अध्यक्षपदी विद्यमान आणि माजी आमदारांची नियुक्ती केली आहे. राजकीय समतोल साधत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या आजी-माजी लोकप्रतिनिधींवर सोपवण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीनुसार, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडील गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे (GSDC) अध्यक्षपद त्यागून ते कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडे सुपूर्द केले आहे. तसेच, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (GTDC) अध्यक्षपद आमदार केदार नाईक यांना देण्यात आले आहे.
गोवा साधनसुविधा विकास महामंडळ (GSDC) अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी सोडले असून, ते कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना देण्यात आले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (GTDC) अध्यक्षपद आमदार केदार नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
कुठ्ठाळ्ळीचे आमदार आंतोनिओ वाझ यांची गोवा खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या (KVIC) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
माजी आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर हे कला अकादमीचे अध्यक्ष बनले आहेत.
गोविंद पर्वतकर यांना गोवा शिक्षण विकास महामंडळ अध्यक्षपद मिळाले आहे.
दयानंत सोपटे यांची बाल भवनच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे मलनिस्सारण महामंडळाचे अध्यक्ष झाले आहेत.
माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांना गोवा राज्य अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
आमदार आलेक्स सिक्वेरा यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.